हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने 11 तारखेला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल. अशा शब्दांत आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली.
मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल. तुमच्यातील ज्या संवेदना आज जिवंत आहेत त्या परत एकदा महाराष्ट्राला दिसल्या. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने आपण MPSC आणि MBBS च्या ज्या परीक्षा पुढे ढकलल्या त्याबद्दल आपले जाहीर आभार! अस ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, विद्यार्थ्यांच्या वतीने बोलत असताना आपला एक सहकारी मंत्री म्हणून आज मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर आभार मानतो. कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेऊन मी त्यांच्याशी एमपीएससी परीक्षेबाबत बोललो होतो आणि त्यांच्यातील संवेदना नेहमीप्रमाणे जाग्या झाल्या. तुमच्यातील या संवेदना आणि माणुसकी राजकारणाला बळी जाऊन देऊ नका. त्या अशाच जिवंत ठेवा.
परीक्षा पुढे ढकलून कोरोना पासून विद्यार्थ्यांना वाचवण्याचे काम तुम्ही केलं त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि त्यांच्या आईवडीलांकडुन मी आपले आभार मानतो अस जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group