‘सच झूठ का फैसला अब कब्रस्तान और समशान करेंगे…जितेंद्र आव्हाड यांचे भाजपाला प्रत्युत्तर

मुंबई : राज्य सरकारला एक्सपोर्ट कंपन्या थेट इंजेक्शन देणार होत्या. त्यांना केंद्रांवर रोखण्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. यावरून राजकारण चांगलंच तापलं असून भाजपने आपले म्हणणे सिद्ध करा असे आव्हान केले आहे. हा तर खोटारडेपाणाचा कळस असल्याचे म्हंटले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत ‘सच झूठ का फैसला कबरस्तान और समशान करेगा…’ असं म्हंटल आहे. त्यांनी आपल्या अधिकृत अकाउंट वरून ट्वीट केले आहे.

त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे की, ‘खरं काय आणि खोटं काय याचा निर्णय आता स्मशान आणि काबरास्तान करेल. कारण स्मशान आणि कबरस्थान खोटं नाही बोलू शकत. या देशाला सांभाळा माझ्या मित्रांनो…घरातून बाहेर नका पडू…’ अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

काय आहे भाजपाचा आरोप

भाजपचे मनसूख मांडवीया यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे की,’नवाब मलिक यांचे ट्वीट धक्कादायक आहे. हे अर्ध सत्य आणि हा खोटेपणा आहे आणि हे अस्वीकार्य आहे.
त्याला परिस्थितीविषयी माहिती नाही. भारत सरकार राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी सक्रिय संपर्क साधत आहे. आणि प्रत्येक प्रकारे रीमॅडेव्हिव्हिर पुरवण्यास मदत करत आहे. असे ट्वीट भाजपकडून करण्यात आले आहे. मनसुख यांचे ट्वीट विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रिट्वीट केले आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like