मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका ; जितेंद्र आव्हाड यांचं जनतेला आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृत्यू मध्येही वाढ होताना दिसत आहे. त्यातच बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं काल अवघ्या 34 व्या वर्षी कोरोनाने निधन झालं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्ट द्वारे जनतेला आवाहन केले आहे.

काय आहे जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट

मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी कोरोनामुळे निधन.जगदीश लाडने अतिशय कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्याने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास ४ वेळा सुवर्णपदकाची कमाई केली होती. एवढंच नव्हे तर मिस्टर इंडिया स्पर्धेत २ वेळा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. तसंच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=331150298377203&id=100044467058135

जगदीश लाड हा फीट असुन, रोगप्रतिकारक शक्ति चांगली असुन सुदधा कमी वयात आपल्याला सोडून गेला. त्यामुळे मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका. काळजी घ्या विनाकारण बाहेर पडू नका. भावपूर्ण श्रद्धांजली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment