हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आवश्यक तेवढे बेड रेमडीसीवीर आणि लसी महाराष्ट्राला मिळत नसल्याचा आरोप वारंवार ठाकरे सरकार कडून केला जात आहे. त्यातच आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यांनी आकडेवारी मांडत केंद्र सरकारला उत्तर दिलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना प्रभावित ११ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचा शनिवारी आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी करोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटर्स वाटपाची माहिती दिली. यात उत्तर प्रदेश, गुजरातपेक्षा महाराष्ट्राला कमी व्हेंटिलेटर्स देण्यात आलेली असून, त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी बोट ठेवलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी या बैठकीची माहिती देणारी बातमी शेअर केली आहे. त्यातील आकडेवारीचा हवाला देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रास ११२१ व्हेंटिलेटर्स, १७०० उत्तरप्रदेशला, १५०० झारखंडला, १६०० गुजरातला, १५२ मध्यप्रदेशला आणि २३० छत्तीसगढला -डॅा. हर्षवर्धन यांची माहिती. …..तरी महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल ……जय महाराष्ट्र,” असं ट्वीट करत आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 17, 2021
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.