मुंबई । संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. या राखीव ठिकाणी वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (२ सप्टेंबर) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अभिनंदनाचं ट्विट केलं.
“मित्रहो….. आम्ही दिलेला शब्द जपला….
आरेचे जंगल वाचावं यासाठी माझ्या सहित अनेक जणांनी आंदोलने केली, तुरुंगात गेले पण तत्कालीन सरकार बधले नाही. परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला.
अभिनंदन आपणा सर्वांचे
#संघर्षाचा विजय असो,” असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
आरेच्या आंदोलनावेळी आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याची माहिती आव्हाड यांनी ट्विट करून दिली होती. अटकेबद्दलचं ते ट्विटही आव्हाड यांनी पोस्ट केलं आहे. आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याच्या जागेसंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रस्तावना केली. तर दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या प्रस्तावासंदर्भात पुढाकार घेतला होता.
मित्रहो…..
आम्ही दिलेला शब्द जपला….
आरे चे जंगल वाचावं ह्यासाठी माझ्या सहित अनेक जणांनी आंदोलने केली
तुरुंगात गेले पण तत्कालीन सरकार बधले नाही
परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला
अभिनंदन आपणा सर्वांचे#संघर्षाचा विजय असो pic.twitter.com/rZMD1NjqrK— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 3, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.