सोलापूर प्रतिनिधी। काल अजित पवार यांनी वेळापूर इथं करमाळा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला आहे. अजित पवारांनी पाठिंबा दिल्यानंतर स्वपक्षाचे उमेदवार संजय पाटील यांनी पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिलेली असताना अचानक अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर करणे हे अजित पवारांचे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांनी दिली.
‘पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर मी दोन वेळा मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला आहे. सर्वसामान्य जनतेच प्रेम शरद पवारांवर आहे. त्यामुळे या निवडणूकीत राष्ट्रवादीला यश मिळणार असताना ही अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदाराचा प्रचार न करता अपक्षाला पाठिंबा जाहीर केला. असे असले तरी मी पूर्ण ताकदिनिशी शरद पवारांच्या विचारानुसार निवडणूक लढवणार असल्याच ही संजय पाटील यांनी सांगितले. अजित पवार यांच्या अपक्ष उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांना स्वपक्षातील कार्यकर्त्यांकडून रोषाला सामोरे जावे लागत आहे.
इतर काही बातम्या-
‘मतदानातील नोटा पर्याय लोकशाहीला घातक’ – चंद्रकांत पाटील
वाचा सविस्तर – https://t.co/OAryb3w1ji@ChDadaPatil @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @BJPLive @INCMumbai @INCPuneMahila #vidhansabha2019#MaharashtraElections2019 #NOTA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 8, 2019
पूर्व विदर्भातील तेली समाजाची नाराजी ‘भाजपा’ला भोवणार ?
पूर्व विदर्भातील तेली समाजाची नाराजी ‘भाजपा’ला भोवणार ?
वाचा सविस्तर – https://t.co/xk1Qvo7vGg@BJP4India @BJP4Maharashtra @CMOMaharashtra #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019 #vidharbha
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 8, 2019
राष्ट्रवादी मधील दत्तात्रय भरणे विरोधक गटाचा हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा
वाचा सविस्तर – https://t.co/7JkNmJnrlC@NCPspeaks @MumbaiNCP @Harshvardhanji #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 8, 2019