मोदी सरकारने दरवाढ करून कंबरडे मोडले मात्र आघाडी सरकार बदल घडवण्यासाठी सत्तेत – सुप्रिया सुळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही मोदी सरकावर वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दरावर निशाणा साधला जात आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकावर हल्लाबोल केला. “इंधन दरवाढ करून मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आर्यन खान जितके दिवस जेलमध्ये होता त्यादिवासात पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढलेत. मात्र, आता चालणार नाही आघाडी सरकार हा जनतेच्यात बदल घडवण्यासाठी सत्तेत आले आहे, असे खासदार सुळे यांनी म्हंटले.

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या तथा आमदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकार मोदी सरकारला धडा शिकवण्यासाठी व या जनतेच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी सत्तेवर आले आहे. मोठ्या प्रमाणात आज गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमतींत वाढ झाली आहे. आर्यन खानला जितके दिवस जेलमध्ये होता त्यादिवासात पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढलेत. याचा कुणी विचार केला आहे का? वारंवार केल्या जात असलेल्या या इंधनाच्या दरवाढीकडे लक्ष जाऊ म्हणून आर्यन खानच्या बातम्या सुरू होत्या.

आता वाढलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशात पेट्रोलचे भाव 121 रुपयांवर तर डिझेलचे भाव 112 रुपयांच्या वर जाऊन पोहोचले आहेत. तर घरगुती गॅसचे दरही वाढल्यान गृहिणींच बजेट बिघडल आहे. या विरोधात संसदेत मी आवाज उठवणार आहे. गॅसचे दर कमी करा यासंदर्भात मागणीही करणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment