कितीही धाडी टाका, महाराष्ट्र अशा गोष्टींसमोर झुकणार नाही; भुजबळांचा भाजपला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात सध्या ईडी, सीबीआय, एनसीबी असा यंत्रणांकडून विविध राजकीय नेत्यांच्या घरांवर, त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर धाडी टाकल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावरून भाजपला इशारा दिला आहे. “या धाडींचा भाजपला फायदा होणार नसून त्यांना फटका बसणार आहे. कोयतीही धाडी टाका, महाराष्ट्र अशा गोष्टींसमोर झुकत नाही,” असे भुजबळ यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्याकडून आज नागपूर जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ईडी आणि आयकर विभागाकडून टाकण्यात येणाऱ्या धाडींना आम्ही घाबरत नाही. या ईडीवाल्यानी माझ्या कुटुंबावर देखील तब्बल18 वेळा धाडी टाकण्यात आल्या. मी जेलमध्ये गेल्यानंतरही धाडी टाकण्यात आल्या.

या धाडीमागे भाजपचा हात आहे. महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्र्यावर आणि ते मानत नसतील तर त्यांच्या नातेवाईकांवर यंत्रणाकंडून धाडी टाकण्यात येत आहेत. या धाडींचा भाजपला फायदा होणार नसून त्यांना फटका बसणार आहे. राज्यातील आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी मंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांवर छापे टाकण्यात येत आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. देशात यापूर्वी अशा प्रकारचे राजकारण व असे कधीच घडले नाही, असे भुजबळ यांनी म्हंटले आहे.