हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी हार्दिक पटेल आणि राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी मंत्री मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. सध्या ईडीपेक्षा कामगारांच्या बिडीलाच जास्त किंमत आहे. त्यामुळे भाजपच्या बांडगुळांनी आता इम्पेरिकल डाटाबाबत बोलावे, अशा शब्दात मुंडे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.
कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेला हार्दिक पटेल, आमदार रोहित पवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंडे म्हणाले की, येत्या काळात हा मतदारसंघ दिल्लीत पोहचेल. सर्व केंद्रीय संस्था सरकारचे काम करत आहेत, ईडीने तर चव घालवली आहे. ईडीपेक्षा कामगारांच्या बिडीला जास्त जव आहे, अशा शब्दात धजनंय मुंडेंनी केंद्रावर टीका केली.
आमचे महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा सत्तेवर आले तेव्हा काहीजण म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि ओबीसी आरक्षण गेले. त्यांनी इतिहास तपासावा व्ही. पी. सिंग यांनी आणलेला आयोग जसाचा तसा स्वीकारला आहे. ओबीसी आरक्षणाची केस चालली त्यांच्या काळात, निकाल आमच्या काळात, आम्ही दोषी कसे? असा सवालही मुंडे यांनी विचारला आहे.