‘खडसेंवर झालेल्या अन्यायाला पवार साहेब न्याय देतील’- धनंजय मुंडे

बीड । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिलीय. “एकनाथ खडसे यांचे मी राष्ट्रवादीत स्वागत करतो. हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे,” अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. “खडसेंच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि राजकीय कामकाजाचा आम्हाला नक्कीच मंत्रिमंडळात फायदा होणार आहे,” असेही धनंजय मुंडे म्हणाले.

“माझ्यासाठी हा खरच आनंदाचा दिवस आहे. मी एकनाथ खडसे यांचे स्वागत करतो. भाजपचा गड ढासळला आहे. खडसेंवर झालेल्या अन्यायाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार न्याय देतील,” असेही धनंजय मुंडे म्हणाले. “खडसेंनी महाराष्ट्रात भाजप उभी केली. त्याच्यांवर कसा अन्याय झाला हे सर्व महाराष्ट्राने पाहिला आहे, असा अन्याय झाल्यानंतर प्रदीर्घ ज्यांनी महाराष्ट्राची सेवा ज्यांच्या विचाराखाली केली. त्याच विचाराकडून अन्याय झाला. आज त्यांना राष्ट्रवादी यावं लागलं,” असेही धनंजय मुंडे म्हणाले.

“राष्ट्रवादीला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे.मी स्वत: खडसेंच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलं आहे. खडसेंच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि राजकीय कामकाजाचा आम्हाला नक्कीच मंत्रिमंडळात फायदा होणार आहे,” असेही धनंजय मुंडेंनी सांगितले. “भाजप नेत्या पंकजा मुंडेंना शिवसेनेचे निमंत्रण दिले असेल तर ते त्यांनी जाहीर करावे,” अशीही प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in