राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह ??

0
41
Eknath Khadase
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. आता ते कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना आता १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. खडसे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत होता. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. ती पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, एकनाथ खडसे यांच्याकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. गेल्या महिन्यातही एकनाथ खडसे यांनी कोरोनाची लागण झाली होती.

जळगावात असताना खडसेंना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली. लक्षणे जाणवताच त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रयाण केले. मुंबईतल्या निवासस्थानी सोमवारी आणि मंगळवारी खडसेंनी आराम केला. दोन दिवसांपासून खडसे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत वा कुणाच्याही संपर्कात नाही. अशात खडसेंनी कोरोनाची चाचणी केली होती. अखेर आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, या घटनेला खडसे परिवाराकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. तसे त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती विश्वसनीय वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. कोरोनाच्या सदृश लक्षणे आढळून आल्याने खडसे यांनी ईडी चौकशीसाठी जाण टाळले होते. त्यांनी दिवसांची मुदत मागितली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here