वे डरते हैं कि, एक दिन गरीब लोग उनसे डरना बंद कर देंगे; जयंत पाटलांचा मोदींवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांसह केंद्रातील विरोधी पक्षांकडून भाजप सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. अनेकवेळा मागणी करून देखील मोदी सरकार पेगासस, कृषी कायदा अशा मुद्द्यावर संसदेत चर्चा घडवून आणत नसल्याने यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कवितेतून निशाणा साधला आहे. “वे डरते हैं कि, एक दिन निहत्थे और ग़रीब लोग उनसे डरना बंद कर देंगे,” अशा कवितेच्या ओली म्हणत पाटलांनी हल्लबोलही केला आहे.

इराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कवी गोरख पाण्डेय यांची उनका डर या कवितेतील ओळी ट्विट केल्या आहेत. त्यामध्ये यांनी म्हणले आहे की, “किस चीज़ से डरते हैं, वे तमाम धन-दौलत गोला-बारूद पुलिस-फ़ौज के बावजूद ? वे डरते हैं कि, एक दिन निहत्थे और ग़रीब लोग उनसे डरना बंद कर देंगे।”, कवितेच्या या ओळी ट्विट करून पाटील यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कविता शेअर करीत कवितेच्या माध्यमातून देशाची परिस्थिती, जनतेची मानसिकता तसेच सरकारच्या हुकूमशाहीवरच ताशेरे ओढले आहेत.

Leave a Comment