दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! जयंत पाटलांनी हाणला चंद्रकांतदादांना आंदोलनांवरून टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात कोरोना साथीवर नियंत्रण मिळवण्यात महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने २२ मे रोजी ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनाची हाक दिली असून त्यावरून राज्यातील राजकारण चांगलाच तापू लागलं आहे. या आंदोलनाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना देणारं एक पत्रक काढलं असून त्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाटील यांनी भाजपला चांगलंच फैलावर घेतलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारविरुद्ध आंदोलनाची हाक दिल्यानंतर या आंदोलनाचे स्वरूप स्पष्ट करणारं एक पत्रक जारी केलं आहे. आंदोलन करताना ‘दो गज की दूरी’ राखा असे सांगताना आंदोलनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवण्याबाबतही खास सल्ला पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. याव्यतिरिक्त या पत्रकात भाजप कार्यकर्त्यांनी कोणत्या घोषणा द्यायच्या याबाबत घोषणांसहित नमूद केलं आहे. दरम्यान, आता या घोषणांवरूनच हे पत्रक आता वादाचं कारण बनत चाललं आहे. भाजपने प्रसिद्ध केलेलं हे पत्रक जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करत अनेक आक्षेप नोंदवले आहेत. या पत्रकातील आक्षेपार्ह बाबी जयंत पाटील यांनी अधोरेखित केल्या आहेत.

”चंद्रकांत पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा ‘महाराष्ट्र धर्म’ पाळण्याचे आदेश दिले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते,” अशा शब्दांत जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. ‘दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी!’ असा टोलाही पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

ह्याचं ‘त्या’ पत्रकातील घोषणा
आंदोलनादरम्यान कोणत्या घोषणा द्यायच्या, हे सांगताना, ‘उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार’ ही घोषणा मुख्यत्वे द्या, असे आदेश चंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. ‘ठाकरे सरकार हाय हाय’, ‘महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव सरकार मात्र आपल्या घरात’, ‘उद्धव मात्र भाषण ठोकतो डरोना डरोना पण रोखता येईना तुला करोना करोना’, ‘हातात वाडगे-केंद्राकडे बोट, निर्णयात मात्र तुझ्याच खोट’ अशी घोषणांची यादी पाटील यांनी पत्रकात दिली आहे. आंदोलन करताना ‘दो गज की दूरी’ राखा असे सांगताना आंदोलनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवण्याबाबतही खास सल्ला पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. दरम्यान, पत्रकातील घोषणांवरून जयंत पाटील यांनी हे आंदोलन महाराष्ट्र बचाव पेक्षा केवळ राजकारणसाठी करत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप आंदोलनाच्या पत्रकावर आक्षेप घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment