मुंबई । लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यामध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यामुळे देशभरात संतप्त भावना उमटली होती. भारतात मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंची आयात होते. त्यामुळं चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या मालावर बहिष्कार टाकण्यात यावा, अशी मागणी देशात मागील काही दिवसांपासून केली जात आहे. या मागणीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका भाजपवर निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये भाजपवर टीका करताना महणाले कि, “विदेशमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेला चीनकडून ३ कोटीच्या आसपास अनुदान. अजित डोवालांच्या संस्थेचे ९ चिनी संस्थांशी घनिष्ठ संबंध. आणि आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला!,” अशा शब्दात भाजपा कार्यकर्त्यांवर आव्हाड यांनी भाजपाला चिमटा काढला.
विदेशमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेला चीनकडून ३ कोटीच्या आसपास अनुदान. अजित डोवालांच्या संस्थेचे ९ चिनी संस्थांशी घनिष्ठ संबंध. आणि आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला!https://t.co/9QDXvUVHtd
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 28, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”