मुंबई । मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मौन सोडलं असून या बातमीचं खंडण केलं आहे. उलट भाजपात गेलेले नेते राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.
नवाब मलिक ट्विटवर याबाबत बोलताना म्हणाले कि, ”राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपामध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन जाहीर केला जाईल.”
कुछ लोग 12 एनसीपी विधायकों की बीजेपी में जाने की अफवाह फैला रहें है, यह बे बुनियाद और मनगढन्त खबर है,
उलट चुनाव से पहले बीजेपी में गए विधायक एनसीपी में लौटने के लिए आतूर हैं लेकिन इस पर अभी कोई फैसला नहीं हुआ है जल्द फैसला कर जानकारी सार्वजनिक की जाए गी ।@PTI_News @ani_digital— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) August 10, 2020
गेल्या वर्षी झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यांनतर पक्षांतर केलेले हे नेते पुन्हा राष्ट्रवादीत येत असल्याचे संकेत नवाब मलिक यांनी दिले आहेत. हे नेते भाजपात नाराज असल्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”