हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारचे कट्टर समर्थक आणि दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी देशातील कोरोना परिस्थिती वर भाष्य करताना प्रथमच मोदी सरकार वर टीका केली. सध्याच्या स्थितीत प्रतिमा बनवणं नाही तर जीव वाचवणं जास्त गरजेच आहे हे सरकारला लक्षात घ्यायला हवं. अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकार वर निशाणा साधला. दरम्यान अनुपम खेर यांच्या टीकेचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांनी देखील मोदी सरकारला टोला लगावला.
मेहबूब शेख यांनी ट्विट करत म्हंटल की आज अनुपम खेर सारखे अंध भक्त बोलयला लागले यावरुन मोदीजी कोरोना काळात तुम्ही देशाची कित्ती वाट लावली हे दिसुन येत आहे .
आज अनुपम खेर सारखे अंध भक्त बोलयला लागले यावरुन मोदीजी कोरोना काळात तुम्ही देशाची कित्ती वाट लावली हे दिसुन येत आहे .
— Mahebub Shaikh (@MahebubShaikh20) May 13, 2021
नक्की काय म्हणाले होते अनुपम खेर –
कोव्हिडमुळे देशात सध्या जी स्थिती निर्माण झालीय त्यासाठी मोदी सरकारला जबाबदार धरणं गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीत प्रतिमा बनवणं नाही तर जीव वाचवणं जास्त गरजेच आहे हे सरकारला लक्षात घ्यायला हवं.सरकारच्या आरोग्य सेवा व्यवस्थापनात चूक झाली आहे. मात्र इतर राजकीय पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी या चुकांचा फायदा घेऊ नये.” असं म्हणत अनुपन खेर यांनी सरकारला दोष दाखवून दिले आहेत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.