शिवसैनिकांचा स्वाभिमान जपण्याचे कार्य पवार साहेबांनी केलं; राष्ट्रवादीने केसरकरांना दाखवला आरसा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात होता असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केसरकर यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना आरसा दाखवला आहे. केसरकर बेकायदेशीर सरकारचे प्रवक्ते असून २०१९ मध्ये शरद पवार यांनीच सर्व शिवसैनिकांचा स्वाभिमान वाचविण्याचे कार्य केले होते असे

महेश तपासे म्हणाले. बेकायदेशीर शिंदे-फडणवीस सरकारचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आरोप केला की, जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली ती शरद पवार यांच्यामुळे फुटली. दीपक केसरकर यांचं हे वक्तव्य अतीशय बेजबाबदार आहे. शिवसेनेचा नीट इतिहास त्यांना माहिती नसावा. शिवसेनेबाहेर पडलेल्या लोकांची कारणं काय होती हे केसरकरांना माहिती नसावं.

बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांचे संबंध किती मधुर होते हे केसरकरांना माहिती नाही. २०१४ मध्ये राज्यात भाजपाचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, मात्र तेव्हा शिवसेनेला साधं शपथविधीचं निमंत्रण देखील देण्यात आलं नव्हतं. आज त्याच शिवसेनेतील बंडखोर आमदार त्याच भाजपासमोर लोटांगण घालत आहेत, खर्या अर्थाने बाळासाहेंबांना वेदना देणारी कृती शिंदे गटाकडून होत आहे असा टोला महेश तपासे यांनी लगावला.

खरं तर २०१९ मध्ये शरद पवार यांनीच सर्व शिवसैनिकांचा स्वाभिमान जपण्याचे कार्य केले होते. शरद पवारांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तिन्ही पक्षांची मोट एकत्र बांधली आणि शिवसेनेकडे महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्रीपद आलं. दिपक केसरकर यांना याचा विसर पडला असावा. दीपक केसरकर बेकायदेशीर सरकारचे प्रवक्ते आहेत, अशी टीका तपासे यांनी केली.

Leave a Comment