कडकनाथ कोंबड्या मागे लागल्यावर खोतांना कळेल काय ते! हसन मुश्रीफांचा पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. तुम्ही कधी क्रिकेट खेळला होता, तरीही तुम्ही क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होताच ना. मग सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली तर बिघडले कुठे? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना केला होता. यानंतर आता कडकनाथ कोंबड्या मागे लागल्यावर खोतांना कळेल काय ते, असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

”शरद पवारांनी वडिलकीच्या नात्याने सचिन तेंडुलकरला सल्ला दिला. शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत भाजपमध्ये गेले आहेत. पवारांवर टीका करताना त्यांना लाज वाटायला हवी होती. पवार साहेब, हे खेळावर प्रेम करणारे आणि खेळाची आवड असलेली व्यक्ती आहे. त्यांनी आयपीएल सुरू करून ग्रामीण भागातील टॅलेंट शोधून काढण्याचं काम केलं. क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतर मानधन मिळवण्यासाठी योजना आणली असं मुश्रीफ म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ”खोतांनी तर कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायातून त्यांनी अनेक बेरोजगारांनना फसवले. त्यांच्या चिरंजीवावर पोलीस केस आहे. कडकनाथ कोंबड्या मागे लागल्या की कळेल खोतांना,” असा इशारा मुश्रीफ यांनी दिला.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment