हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद उफाळून आला आहे. याच दरम्यान हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका करतात त्यांना चांगलाच टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटलांचे दोन स्वभाव आहेत ,एक साधभोळा तर दुसरा म्हणजे विरोधकांचा काटा काढायचा, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांतदादांनी मला खूप त्रास दिला. सत्तेत असताना त्यांनी माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या. ईडीच्या धाडी टाकल्या. कोल्हापूर जिल्हा बँकप्रकरणीही त्रास दिला. ते लोकांना मदत करतात. त्यांचे दोन स्वभाव आहेत. एक साधाभोळा स्वभाव आणि दुसरा म्हणजे विरोधकांचा काटा काढण्याचा.
पोटनिवडणुका लावा. कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही. भाजपचा एकही आमदार नसल्याने पोटनिवडणुका कशा होतील? असे सवाल करतानाच जी गोष्ट होणारच नाही, त्यावर चंद्रकांतदादा कशासाठी बोलत आहेत?, असा सवालही त्यांनी केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’