हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर प्रमोद जठार यांनी ‘छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरमधून अटक झाली होती. यानंतर औरंजेबाच्या सरकार संपले होते. संभाजीराजेंसोबत दगाफटका झाल्यानंतर औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्रात केले होते. त्यामुळे या सरकारने लक्षात ठेवावे त्यांचे थडगे महाराष्ट्रात उभे केल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन निशाणा साधला आहे.
आमदार मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “छ.संभाजी महाराजांची संगमेश्वरातील अटक “दिल्लीश्वराच्या” सांगण्यावरून मोगलांनी केली होती. मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत दिल्लीश्वरापुढे न झुकणाऱ्या छ. संभाजी महाराजांची तुलना दिल्लीची हुजरेगिरी करणार्याशी कुणी केली तर मावळ्यांचा ‘जठरा’ग्नी प्रज्वलीत होईल हे विसरू नका.”,अशा शब्दात मिटकरी यांनी निशाणा साधला आहे.
छ.संभाजी महाराजांची संगमेश्वरातील अटक "दिल्लीश्वराच्या" सांगण्यावरून मोगलांनी केली होती. मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत दिल्लीश्वरापुढे न झुकणाऱ्या छ. संभाजी महाराजांची तुलना दिल्लीची हुजरेगिरी करणार्याशी कुणी केली तर मावळ्यांचा 'जठरा'ग्नी प्रज्वलीत होईल हे विसरू नका.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 27, 2021
दरम्यान, प्रमोद जठार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत शिवसेना पक्षातील आमदारांनी निषेध नोंदविला आहे. तसेच जठार यांचे हे कृत्य अत्यंत निंदनीय व छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारे असल्याची तक्रार शिवसेना आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक यांनी पोलीस ठाण्यात केली आहे.