अजित पवारांच्या शपथविधीला गेलेले आमदार आज शरद पवारांच्या गाडीत; रात्रीत गेम फिरवला?

Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कराड दौऱ्यावर होते. गुरुपौर्णिमेनिमित्त पवार यांनी आज सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार आता ऍक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या कालच्या शपथविधी कार्यक्रमध्ये उपस्थिती लावलेले राष्ट्रवादीचे आमदार आज शरद पवारांच्या गाडीत पाहायला मिळाल्याने रात्रीत गेम फिरवला गेला काय अशा चर्चा रंगल्या आहेत.

माजी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी काल दुपारी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या एकूण 9 आमदारांचा शपथविधी कार्यक्रम काळ पार पडला. यानंतर राज्याच्या राजकारणात एकाच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या भूतीमुळे महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भुमीका जाहीर केली. तसेच कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन आता पक्षाची पुनर्बांधणी नव्याने करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात अचानक घडलेल्या या घटनांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीकडून रात्री १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन भाजपसोबत गेलेल्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर मध्यरात्री अनेक घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या आमदारांना फुटण्यापासून रोखण्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले. आज शरद पवार यांनी सकाळी कराड येथे यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाला भेट दिली. यावेळी शरद पवारांच्या गाडीत काल अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असलेले आमदार पासून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

कोण आहेत हे आमदार?

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे काल अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी कार्यक्रमास उपस्थित राहिले होते. आज हे तिन्ही नेते शरद पवार यांच्या गाडीतून कराड येथे आल्याने रात्रीत गेम फिरवण्यात आला का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.