हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहित पवार यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून 30 पेक्ष्या अधिक राजकीय नेत्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यामुळे चिंता वाढली आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!
तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2022
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच राजकीय नेत्यांना देखील कोरोनाचा विळखा बसला आहे. खासदार सुप्रिया सुळे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, अशा अनेक मातब्बर नेत्याना कोरोनाची लागण झाली आहे.