‘आंदोलनजीवी’ शब्दाबद्दल मी पंतप्रधानांचा अतिशय आभारी! कारण.. खासदार अमोल कोल्हेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना ‘आंदोलनजीवी’ म्हटलं होतं. त्यावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत तुफानी भाषण करत पंतप्रधानांच्या आंदोलनजीवी शब्दावर जोरदार निशाणा साधला आहे. आंदोलनजीवी शब्दाबद्दल कोल्हे यांनी मोदींचे आधार मानत जोरदार प्रहार केला.

”आज देशाला दोन नवे शब्द मिळाले आहेत. त्यातला एक आहे आंदोलनजीवी. मी या शब्दाबद्दल अतिशय आभारी आहे, कारण महाराष्ट्रातील भाजपाचे नेते उठसूठ आंदोलन करीत होते. त्यांना काय म्हणायचं हे आम्हाला या शब्दामुळे समजलं. पण ज्या कष्टकरी वर्गासाठी बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही ठामपणे उभे राहतात ते मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहेत. ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे, त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.

”पंतप्रधानांच्या भाषणात आम्हाला आत्मनिर्भर भारत हा एक चांगला शब्द ऐकायला मिळाला. जेंव्हा आम्ही सर्वांनी देश को बिकने नहीं दूँगा हे ऐकले होते तेव्हा आम्हाला अभिमान वाटला होता. पण त्यानंतर मात्र ओएलएक्सची जाहिरात जास्तच प्रभावी झाली आणि ती धोरणातही दिसू लागली. जे आहे ते विकून टाकण्याचा सपाटा या सरकारने लावला. त्यामुळे आता भीती वाटतेय की, हे सरकार आत्मनिर्भर भारताची उभारणी करतंय की ‘मुठभर पुँजीपतीनिर्भर’ भारताची”, असा सवाल उपस्थित करत अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment