हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे धोरण आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे तोरण, यामुळेच पदवीधर शिक्षक निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा निभाव लागला नाही. पुणे आणि नागपूर हे आपले हक्काचे मतदारसंघ देखील भाजपला गमवावे लागले. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर बहुजन समाजाची ताकद किती प्रमाणात वाढू शकते याच हे उदाहरण आहे, असंही राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी अधोरेखित केले.
महाविकास आघाडी स्थापन होऊन एक वर्ष झालं आणि हे दणदणीत यश आलं. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर बहुजन समाजाची ताकद किती प्रमाणात वाढू शकते, याचं हे उदाहरण आहे. शरद पवारांचं धोरण आणि तीन पक्षांनी बांधलेलं तोरण यातून हा विजय झालेला आहे, अशी प्रतिक्रिया साता-याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली. सहाही जागा जिंकण्याचा दावा करणा-यांना एका जागेवर समाधान मानावं लागलं, असा टोलाही श्रीनिवास पाटील यांनी भाजपला लगावला.
दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निकाल हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि गेल्या वर्षभरात केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली पावती आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’