हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी 127 व्या घटनादुरुस्तीमध्ये सुधारणा करणारे विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत राज्यातील खासदारांची तोफ चांगलीच धडाडली. दरम्यान आज शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारला इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा हटवून सर्वांना स्वतंत्र हक्काचं आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.
दिल्लीत लोकसभेच्या अधिवेशनात आज मराठा आरक्षणासंदर्भात 127 व्या घटनादुरुस्तीमध्ये सुधारणा करणाऱ्या विधेयकावर चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवावी, सर्वांना स्वतंत्र हक्काचं आरक्षण दिले पाहिजे. एका समाजाचे आरक्षण काढून ते दुसऱ्या समाजाला द्यायचे. असे केल्यास याचा कुणालाही फायदा होणार नाही. त्यामुळे सर्वाना स्वातन्त्रपणे आरक्षणाचा हक्क द्यावा.
लोकसभेत पार पडलेल्या चर्चेवेळी सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्यातील आरक्षणाबाबत जो लढा दिला जात आहे. त्यामध्ये राज्याबरोबर केंद्र सरकारनेही पाठींबा देऊन उभे राहावरे. कारण राज्यातील ओबीसी समाजातील बांधवांच्या दृष्टीने आरक्षणाचा प्रश्न सुटणे अत्यंत महत्वाचे आहे, अशी विंनती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.