हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता काबीज केली. भाजपच्या या दारुण पराभवानंतर विरोधकांनी मोदी-शहांवर हल्लाबोल केला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी गृहमंत्री अमित शाह राजीनामा कधी देणार? असा सवाल केला आहे.
निवडणूक कालावधीत जेव्हा बंगालमध्ये हिंसाचार झाला, तेव्हा केंद्रीय सुरक्षा दलाने सहा लोकांना मारण्याचं काम केलं. ममता बॅनर्जींनी अमित शाह यांचा राजीनामा मागितला होता. तेव्हा अमित शाह म्हणत होते की, मी त्यांच्या मागण्यावर राजीनामा देणार नाही. जनतेने मागणी केली तर राजीनामा देईल. एवढा मोठा पराभव याचा अर्थ जनता तुम्हाला राजीनामा मागत आहे. अमित शाह राजीनामा कधी देणार हे देश जाणू इच्छित आहे.” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. मोदी-शहांचा झंझावाती प्रचाराला ममतांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर देत भाजपला अस्मान दाखवलं.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.