अनिल परब यांच्यावरील कारवाई हि सूडबुद्धीने; नवाब मालिकांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब याना ईडीची नोटीस आल्यांनतर महाविकास आघाडीने भाजपवर टीका केली आहे . अनिल परब यांच्यावरील कारवाई हि सूडबुद्धीने करण्यात येत आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

नवाब मलिक म्हणाले, नारायण राणे याना अटक झाल्यानंतर अनिल परब याना ईडीची नोटीस येणार हे अपेक्षित होत. अनिल परब यांना ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जाईल. सूडबुद्धीने हे राजकारण सुरू आहे. याबाबत आता लोकांच्या मनात कसलीच शंका उरली नाही, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे याचाही त्यांनी समाचार घेतला. राज्यात कोरोनाचा धोका अजूनही कायम असून स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांचं देखील भाजपचे लोक ऐकत नाही. लोकांची दिशाभूल करत आहेत आणि कोरोनाचा धोका वाढवत आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी केला

Leave a Comment