हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या नोटबंदी ला आज पाच वर्षे पूर्ण झाली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नोटबंदी फेल गेली. नोटबंदीमुळे काळा पैसा काही परत आला नाही तसेच भ्रष्टाचारदेखील कमी झाला नाही. मोदीजी तुम्ही ३ महिने मागितले होते. आता त्यांनी सांगावे की आम्ही कोणत्या चौकात यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.”
नोटबंदीमुळे देशात बेरोजगारी वाढली. अर्थव्यवस्थेचा कणा मोडल्याचा दावा मलिक यांनी केला. नोटबंदीमुळे देशातून आंतकवाद, काळा पैसा संपला का? असे सवाल त्यांनी केलेत.नोटबंदी नंतर रांगेत उभे राहून अनेक लोकांचा जीव गेला. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अर्थव्यवस्था कोलमडल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.
“पंतप्रधान मोदींनी नोटबंदीची घोषणा केली तेव्हा भ्रष्टाचार, दहशतवाद संपेल, काळा पैसा परत आणू अशी अनेक आश्वासने दिली. तसंच भ्रष्टाचार संपला नाही तर मला चौकात शिक्षा द्या असं म्हटलं होतं. मोदीजींनी म्हटल्याप्रमाणे झालं नाही तेव्हा त्यांना आता कोणती शिक्षा द्यायची असा प्रश्न मलिक यांनी विचारला आहे.”