नवाब मलिक यांचे ट्विट ठरतंय चर्चेचा विषय; कोंबड्याचा फोटो शेअर करत म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यातच आता नवाब मलिक यांच्या एका ट्विट ने लक्ष वेधून घेतले आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत एका कोंबड्याचा फोटो शेअर करत ओळखा पाहू कोण ? असा सवाल केला आहे. मलिक यांच्या फोटोवरून त्यांचा रोख हा नितेश राणे यांच्या कडे आहे ही काय असा प्रश्न उपस्थित होतो.

नवाब मलिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये एक कोंबडा दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या या कोंबड्याच्या डोक्यावर लाल रंगाचा एक तुरा देखील आहे. पण विशेष म्हणजे या कोंबड्याचा चेहरा मात्र मांजरीचा आहे.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमेवत बसले होते. त्यावेळी, नेमकं आदित्य ठाकरे पायरी चढून वर जात असताना, नितेश राणेंनी त्यांच्याकडे पाहून म्याव, म्याव… असा आवाज काढला. त्यामुळे नवाब मलिक यांनी फ़ोटो शेअर करत नितेश राणेंना टोला लगावला की काय असा प्रश्न आहे.

Leave a Comment