हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. अहमदाबाद येथे ही भेट झाली असून यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल देखील होते असेही समोर येत आहे. या भेटीने राजकीय खळबळ उडाली असून राष्ट्रवादी – भाजप युती होणार का अशी शक्यता निर्माण झाली. दरम्यान आता खुद्द प्रफुल्ल पटेल यांनी यावर भाष्य करत या गोष्टीची शक्यता फेटाळली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत युती करणार असल्याच्या वृत्ताचा प्रफुल्ल पटेल यांनी इन्कार केला आहे. उद्धव ठाकरे ( cm thackeray ) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मोट शरद पवारांनी बांधली. अशा वृत्तांमध्ये काहीही अर्थ नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मात्र सूचक वक्तव्य करत सस्पेन्स वाढवला आहे. काही गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, असं शहा यांनी म्हटलं आहे. शरद पवारांसोबत भेट झाल्याच्या वृत्ताचं खंडन अमित शहा यांनी केलेलं नाही. त्यामुळेच शहांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group