हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केले मात्र मेट्रोचे काम अर्धवट पूर्ण झालंय असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटल होत. त्यानंतर भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून पवारांवर निशाणा साधला. पवार साहेब, कौतूक करण्यासाठी तरीं मनाचा मोठेपणा दाखवा, ट्रायल साठी लगबगीने गेलात आणि अर्धवट काम कस म्हणता असा सवाल भाजपने केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला मेट्रो कामाचा इतिहासच दाखवला.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल, रेटून ‘फेकणं’ ही भाजपाची नेहमीची सवय असली तरी लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून आणि खोटारड्या भाजपाला आरसा दाखवण्यासाठी ‘मेट्रो प्रवासा’चा हा इतिहास…????
२००९ ला पुणे व पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची सत्ता असताना मेट्रोचा प्रस्ताव तयार करण्यात आला.त्यानंतर राज्यात आघाडी तर केंद्रात UPA सरकार असताना तो मंजुरीसाठी पाठवला आणि महापालिकेत राष्ट्रवादी- काँग्रेसची सत्ता असतानाच मेट्रोचं भूमिपूजन झालं. पण गेल्या पाच वर्षात पुणे मेट्रोच्या ५४ कि.मी.च्या प्रकल्पापैकी ३२ कि.मी.चा पहिला टप्पाही अजून भाजपला पूर्ण करता आला नाही.
त्यानंतर राज्यात आघाडी तर केंद्रात UPA सरकार असताना तो मंजुरीसाठी पाठवला आणि महापालिकेत राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता असतानाच मेट्रोचं भूमिपूजन झालं. पण गेल्या पाच वर्षात पुणे मेट्रोच्या ५४ कि.मी.च्या प्रकल्पापैकी ३२ कि.मी.चा पहिला टप्पाही अजून भाजपला पूर्ण करता आला नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 6, 2022
पण निवडणूक येताच ५ कि.मी.च्या अर्धवट मार्गाचं मेट्रोपेक्षाही सुस्साट वेगाने उद्घाटन केलं. आपण पेट्रोल-डिझेलवर भरमसाठ कर लावून सामान्य माणसाचा खिसा कापला. तरीही गेल्या ६० वर्षांत विविध सरकारांनी कष्टाने उभ्या केलेल्या संस्था/कंपन्यांची विक्री करावी लागली. हे आपलं कर्तृत्व!