हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश मध्ये सध्या उत्तर प्रदेशात ब्लॉक प्रमुखाच्या निवडणुकीचा धामधुम सुरु झाली असून समाजवादी पक्षाच्या एका महिला उमेदवाराची साडी खेचण्याचा भय़ंकर प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याच घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
महाभारतात कौरवांनी द्रौपदीचं वस्त्रहरण केल्याचं आपल्याला माहीत आहे… पण कौरवांची वृत्ती आजही कायम असल्याचं दिसतंय! कारण उत्तर प्रदेशात एका महिला भगिनीच्या वस्राला भाजपच्या लोकांनी भर रस्त्यात हात घातलाय… हे आधुनिक काळातील कौरव तर नाहीत ना? असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.
महाभारतात कौरवांनी द्रौपदीचं वस्त्रहरण केल्याचं आपल्याला माहीत आहे…
पण कौरवांची वृत्ती आजही कायम असल्याचं दिसतंय!
कारण उत्तर प्रदेशात एका महिला भगिनीच्या वस्राला भाजपच्या लोकांनी भर रस्त्यात हात घातलाय… हे आधुनिक काळातील कौरव तर नाहीत ना? https://t.co/CcT2FqxXll
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 10, 2021
नक्की काय आहे प्रकरण-
समाजवादी पक्षाची एक महिला कार्यकर्ती शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. मात्र, तिथे असलेल्या विरोधी उमेदवारांशी त्यांचा वाद झाला. यादरम्यान संबंधित उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं, तसेच त्यांची साडी खेचण्याचा प्रयत्न प्रयत्न केल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून केला जात आहे.
दरम्यान, प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीका होत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याची दखल घेत क्षेत्राधिकारी आणि केंद्र प्रभारी अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्या महिलेशी गैरवर्तन करणारे कार्यकर्ते हे अपक्ष उमेदवाराचे समर्थक असल्याचं सांगत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.