मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय? – रूपालीताई चाकणकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेले पेट्रोल – डिझेलचे दर 5 राज्यातील निवडणूकांच्या निकालानंतर अचानक वाढले. यावरून आता मोदी सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?,” असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं. काही नाही तर निदान पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते. पाच राज्यांच्या निवडणुक निकालापासून आजची सलग चौथ्या दिवशी भाववाढ. सन्माननीय पंतप्रधान मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?,” असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली.

देशात आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. शुक्रवारी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर २७ पैशांनी वाढून ९७.६१ रुपयांवर पोहोचले. तर डिझेलच्या दरात ३३ पैशांची वाढ झाली. मुंबईत डिझेलचे दर ८८.८२ रूपयांवर पोहोचले. तर दुसरीकडे दिल्लीमध्येही पेट्रोलचे दर २८ पैशांनी वाढून ९१.२७ रुपयांवर पोहोचले

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.