Wednesday, June 7, 2023

बंडातात्या वारकरी संप्रदायाला लागलेला डाग, त्यांना येरवड्यात उपचाराची गरज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी निशाणा साधला. बंडातात्या वारकरी संप्रदायाला लागलेला डाग आहे अशी टीका त्यांनी केली.

रुपाली पाटील यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, महाराष्ट्राच्या महिला लोकप्रतीनिधी व लोकनेत्याच्या लेकींना दारू पिऊन नाचतात म्हणणारे बंडातात्या वारकरी संप्रदायाला लागलेला डाग आहे.’ तसेच तात्याला येरवड्यात उपचाराची गरज असून समस्त महिलांची त्यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा खळखट्याक अटक आहे, असेही पाटील म्हणाल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावरून बंडातात्या कराडकर यांच्यावर टीका केली आहे. एका किर्तनकाराने महिलांवर घसरावं ही महाराष्ट्राची आणि वारकऱ्यांची संस्कृती नाही. त्यामुळे ते खरे वारकरी आहेत की नाही हे तपासून पाहण्याची फार पूर्वीपासून गरज होती. आता त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून महाराष्ट्राला सिद्ध करून दिलं की ते कोण आहेत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.