पराभूतसम्राट सांगे लोकांना, शेम्बुड त्याच्याच नाकाला; राष्ट्रवादीचा राणेंवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राणे कुटुंबीय आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष आता वाढलेला दिसत आहे. त्याच दरम्यान, निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका करताना अजित पवारांनी आधी स्वतःच्या नाकातील शेंबूड काढावा असा जळजळीत टोला लगावला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस कडून राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर आले असून पक्षात नवीनच दाखल झालेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राणेंवर टीका केली आहे.

“राणे” ने आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसूनहि “अजितदादा” च्या नाकापर्यंत राजकीय उंची भरणार नाही. #पराभूतसम्राट सांगे लोकांना, शेम्बुड त्याच्याच नाकाला अस जोरदार टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

निलेश राणे नेमकं काय म्हणाले-

राज्य सहकारी बँक लुटली, सहकारी साखर कारखाने आजारी पाडून कवडीमोल किंमतीत खरेदी करून स्वतःच्या कुटुंबियांच्या नावे केले. ज्याच नाव लिहून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात तो माणूस सिंधुदुर्गात येऊन सहकारातील ज्ञान पाजळतो. अजित पवार स्वतःच्या नाकातलं शेंबुड पुसा अगोदर. अशी टीका निलेश राणे यांनी केली होती.