हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या युपीए अध्यक्ष पदावरून चर्चा रंगल्या होत्या. दिल्लीत युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीने हा ठराव मंजूर केल्यानंतर या घडामोडीनी वेग घेतला होता. त्यावरून आज शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपल्याला यामध्ये रस नाही अस म्हणत पवारांनी या संपूर्ण शक्यतांवर पडदा टाकला.
शरद पवार यांनी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हंटल की, मध्यंतरी आमच्या एका तरुणाने युपीएचा अध्यक्ष व्हावा यासाठी ठराव केला. मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्याच पडणार नाही. मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही.पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य, शक्ती, पाठिंबा, मदत देण्यासाठी माझी तयारी आहे,” असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टिकेचाही कडक शब्दांत समाचार घेतला. राज ठाकरे ३-४ महिने भूमिगत होतात. मग त्यानंतर एखादं लेक्चर देतात. मग पुन्हा ३ ते ४ महिने भूमिगत होतात राज यांच्या राजकारणाचं हेच वैशिष्ट आहे. अशा शब्दांत पवारांनी राज ठाकरे यांना टोला हाणला.