हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पासाठी पाठींबा दर्शवत प्रकल्प हातातून गमावू नका अस थेट पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान पत्र वाचल्यानंतर शरद पवारांनी राज ठाकरेंना फोन केल्याचं आता समोर येत आहे.
राज ठाकरे यांनी सोमवारी कृष्णकुंजवर जमलेल्या नाणार प्रकल्प समर्थकांना ही माहिती दिली. मी नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन, असे शरद पवार यांनी सांगितल्याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे आता नाणार प्रकल्पाविषयीच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
फडणवीसांनी केलं राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत
दरम्यान राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही त्याचे स्वागत करतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. येवडच नव्हे तर शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर तेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’