व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला पवारांचा प्रतिसाद ; शरद पवारांकडून पुढील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ हे एका लग्न सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत उपस्थित होते. दरम्यान आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार यांनी 1 मार्चपर्यंत आपले सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शरद पवारांनी हा निर्णय घेतला आहे.

गर्दी टाळून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सभा, आंदोलने किंवा सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी 21 फेब्रुवारीला सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या होत्या

राज्यातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सोमवारपासून राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीय. तसंच कोरोना संसर्गाच्या या कठीण काळात अशा तत्सम कार्यक्रमांचं आयोजन करु नये अस आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’