राहुल गांधींच्या नेतृत्त्वाबद्दल शरद पवारांचे मोठं विधान! म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे असे परखड मत व्यक्त केले आहे. लोकमत दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हा दावा केला आहे.

शरद पवार म्हणाले, कोणत्याही पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षात आणि लोकांमध्ये किती असते, हे पाहणे महत्त्वाचे असते. आजही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पाहण्यास मिळत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी हे दोघेही त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे बरेच नेते हे त्यांच्या विचारांचे आहेत आणि वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांच्या मध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे असे परखड मत व्यक्त केले आहे.

यावेळी देश राहुल गांधींचे नेतृत्व मानायला तयार आहे का, अशी विचारणा केली असता शरद पवार म्हणाले की, असे आहे की त्यांच्यामध्ये काही प्रश्न आहेत. त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे. तसेच बराक ओबामा यांनीही आपल्या पुस्तकात राहुल गांधींबाबत केलेल्या उल्लेखाबाबतही पवार यांनी प्रतिक्रिया दिली. बराक ओबामा यांनी त्यांची मतं मांडली असतील. पण सगळ्यांची मतं आपण मान्य केली पाहिजेत असं नाही. आपल्या देशातील नेतृत्वाबाबत मी काही बोलेन, पण बाहेरील देशातील नेतृत्वाच्या प्रश्नाबाबत मी फारशी चर्चा करणार नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’