हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाच आगमन झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वच नेत्यांनी आपापल्या घरच्या बाप्पाची मनोभावे पूजा केली. सर्वच नेत्यांनी करोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना गणरायाकडे केली. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही गणपती बाप्पा कडे साकडे घालताना म्हटलं आहे की सर्वांचे मंगल कर.
शरद पवारांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘मनाला प्रसन्न करणारे श्रीगणेशाचे सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी रूप हे मानवासाठी सौख्याचे अधिष्ठान आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. तसंच, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छाही पवार यांनी दिल्या आहेत.
मनाला प्रसन्न करणारे श्रीगणेशाचे सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी रूप हे मानवासाठी सौख्याचे अधिष्ठान आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे,ही श्रींचरणी प्रार्थना. सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! pic.twitter.com/SRgoxaOUAl
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 22, 2020
याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करून जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ‘कोरोना विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी आणि या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो,’ अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’