मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांना फक्त राजकारण करायचं- शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर स्थगितीचा निर्णय दिल्यापासून विरोधकांनी ठाकरे सरकाराला घेरलं आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणा वर बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडलं असल्याचे विरोधकांचं म्हणणं आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘मराठा आरक्षण प्रकरणी आम्हाला राजकारण करायचं नाही असं सांगताना शरद पवार यांनी अध्यादेश काढला तर आंदोलन होणार नाही असं मत व्यक्त केलं. मराठा आरक्षण प्रकरणी विरोधकांना राजकारण करायचं आहे अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“मला जिथपर्यंत कायदा कळतो त्याप्रमाणे मराठा आरक्षणा संदर्भात अध्यादेश आणू शकतो. फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आम्हाला मराठा आरक्षण प्रकरणी राजकारण करायचं नाही तर विद्यार्थ्यांना दिलासा द्यायचा आहे. काहींना मराठा समाजात प्रक्षोभ वाढावी असं वाटत असेल,” अशी टीकाही त्यांनी केली. मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको असं आवाहन करताना मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.

कंगना प्रकरणाशी सरकारचा संबंध नसल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. “कंगना प्रकरणाचा सरकारशी काही संबंध नाही. कार्यालयावर कारवाई मुंबई पालिकेने केली आहे. पालिकेचे काही नियम असून त्यानुसार ते कारवाई करत असतात. कारवाईचा निर्णय सरकारचा नाही तर पालिकेचा आहे. सर्व जबाबदारी पालिकेची आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.