हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली असून खर स्वातंत्र्य 2014 ला मिळालं अस विधान करणाऱ्या कंगना राणावतला पाठिंबा दिल्यानंतर जेष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना विचारले असता त्यांनी एकाच वाक्यात विक्रम गोखले यांचा समाचार घेतला.
विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन केल्याबाबत शरद पवार म्हणाले की, समाजात विकृत मनोवृत्तीचे लोक असतात, त्यांची दखल घ्यायची नसते, असे म्हणत शरद पवारांनी विक्रम गोखले यांच्यावर टीका केली.शरद पवार नाशिकमध्ये महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ अधिवेशनात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमापूर्वी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विक्रम गोखले यांच्यावर टीका केली.
विक्रम गोखले नेमकं काय म्हणाले-
कंगना जे म्हणाली ते खरं आहे. मी समर्थन करतो तिच्या वक्तव्याचे. कोणाच्या मदतीने हे स्वातंत्र्य मिळालं आहे? आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते. तेव्हा त्यांना फाशीपासून कोणी वाचवलं नाही. हे चुकीचं आहे, असं ते म्हणाले. मतपेट्यांचं राजकारण करणाऱ्यांमुळेच हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, दलित असा वाद होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.