राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे असेही पवारांनी सांगितलं

माझी कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. अस ट्विट शरद पवार यांनी केलं

शरद पवार हे सातत्याने महाराष्ट्रभर फिरत असतात. वयाच्या 80 व्या वर्षी देखील पवार अनेक ठिकाणी जाऊन तसेच विविध कार्यक्रमाना हजरीं लावून लोकांना मार्गदर्शन करत असतात. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक नेत्याना कोरोना ची लागण झाली आहे. अनेक आमदार, खासदार कोरोनाच्या विळख्यात आहेत. त्यातच आता दिग्गज नेते शरद पवार यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे