हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बेछूट आरोप करणं थांबवावे, अन्यथा त्यांच्याविरूद्ध अहमदनगर जिल्ह्यात फौजदारी कारवाई केली जाईल,’ असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा अॅड. शारदाताई लगड यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोमय्यांनी आमचे नेते खासदार शरद पवार आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप सुरू केले आहेत. त्याचबरोबर सोमय्या महाविकास आघाडी सरकारची बदनामी करत आहेत. ज्या लोकांना सवंग प्रसिद्धिची सवय झाली आहे, ते असे बेछुट आरोप करतात. त्यांनी ते आरोप थांबवावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात अहमदनगर जिल्ह्यातही फौजदारी कारवाई केली जाईल, असं शारदाताई लगड यांनी सांगितलं.
ज्या लोकांना सवंग प्रसिद्धीची सवय झाली आहे, ते असे बेछुट आरोप करतात. सोमय्या यांनी हवेत गोळीबार करू नये. अनेक रथीमहारथींनी पवार यांच्या आरोप केले होते, परंतु त्यांचा एकही आरोप त्यांना शाबीत करता आला. उलट तुम्ही आमचे नेते पवार यांचा आदर्श घेऊन समाजात कसे वागल पाहिजे हे शिकून घ्या,’ असा सल्लाही लगड यांनी सोमय्या यांना दिला आहे.