हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेगासस प्रकरणावरून शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जातोय. हेरगिरीबाबत मोदी व शहा हे बोलायलाच तयार नसल्याचे विरोधक म्हणत आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “पेगाससने नाही तर मग देशात येऊन कुणी हेरगिरी केली?,” असा सवाल मलिकांनी मोदींना विचारला आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हेरगिरी प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, पेगासस स्पायवेअर’ची निर्मिती करणारी इस्त्रायली कंपनी ‘एनएसओ’ सोबत कोणताही व्यवहार झालेला नाही, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मग जगातील कोणत्या देशाने आपल्या देशात येऊन ही हेरगिरी केली. याच्यासाठी केंद्रसरकारने तात्काळ चौकशी समिती नेमण्याची आम्ही मागणी करीत आहोत.
या हेरगिरी प्रकरणाबाबत केंद्रसरकारने संसदेत येऊन सरकारच्या कुठल्याही एजन्सीने पेगासससोबत व्यवहार केलेला नाही किंवा सेवा घेतलेली नाही हे स्पष्ट सांगितले पाहिजे. जर केंद्र सरकारने कोणतीही सेवा घेतलेली नसेल तर संसदेत येऊन स्पष्टपणे सांगावे, अशी मागणी यावेळी मलिक यांनी केली आहे.