हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आर्यन खान ड्रग प्रकराणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एक ट्विट करून ड्रग्ज प्रकरणी भाजपला सूचक इशारा दिला आहे. “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे. असे मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एक नवीन ट्विट केले आहे. आणि इशारा दिला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “शुभ दीपावली आप सभी की दिवाली मंगलमय हो..,होटल ‘The Lalit’ मे छुपे है कई राज़…मिलते है रविवार को. “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे, असे मलिक यांनी म्हंटले आहे.
शुभ दीपावली
आप सभी की दिवाली मंगलमय होहोटल 'The Lalit' मे छुपे है कई राज़…
मिलते है रविवार को— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
नवाब मलिक यांनी आज केलेल्या नवीन ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्याकडून आता कुणावर हल्लाबोल केला जाणार?, कुणाला लक्ष्य केले जाणार याकडे लक्ष लागले आहे.
बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी
लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते मलिक यांनी यापूर्वीही ट्विट करीत एनसीबी अधिकार समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबियांवर आरोप केले होते. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता.