गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी गोपीचंद पडळकरांची गत ; राष्ट्रवादीची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी गत गोपीचंद पडळकर यांची झाली असून त्यांनी पवार साहेबांवर टीका करण्याआधी आपण आपल्या आयुष्यात नक्की काय केलं याचा विचार करावा अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी पडळकर यांच्यावर निशाणा साधला.

भाजपने अनेक डुप्लीकेट कलाकारांना केवळ राष्‍ट्रवादी आणि पवार कुटुंबावर टीका करण्यासाठी पक्षात प्रवेश दिला आहे,महाराष्ट्रातील पन्नास वर्षाहून अधिक काळ काम केलेल्या नेत्यांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या आ.गोपीचंद पडळकरांनी स्वतःची पात्रता तपासून बोलावे अशी टोला शेळके यांनी लगावला आहे. आपल्याला विधान परिषद दिलीं याचा अर्थ फार मोठी संधी दिल्यासारखं समोरच्याला वाट्टेल तस बोलू नये असेही सुनील शेळके म्हणाले.

आम्हीही फडणवीस,नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करू शकतो.मात्र,आपल्या मर्यादा ओळखून आपण आपल्या उंचीच्या बरोबरीच्या लोकांच्या कामावर उणिवांवर बोट ठेवावे अस म्हणत त्यांनी पडळकर याना फटकारले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment