उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा भक्कम पाठिंबा- अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसचा भक्कम पाठिंबा असेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. यानंतर प्रसारमाध्यमे बोलताना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. हीच आमची भूमिका असून प्रसारमाध्यमांनी चुकीची माहिती पसरवू नये असं अजित पवार म्हणाले. तसेच निधी वाटप करताना मी कधीही दुजाभाव केला नाही. सगळ्यांना विकासकामांमध्ये मदत करण्याची भूमिका माझी असते त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अस विधान का केलं असेही अजित म्हणाले

दरम्यान, बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल. हे सरकार टीकावे यासाठी सगळे प्रसत्न आपण करू, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. त्यामुळे बंडखोरांबाबत सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहायला हवे.