हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात MPSC विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा विषय चर्चेत आहे. MPSC परीक्षेच्या नव्या पेपर पॅटर्नविरोधात विद्यार्थ्यी चांगलेच आक्रमक झाले आहेत. 2025 पासून नवा पेपर पॅटर्न लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यानी दिलेल्या उत्तराने शिंदे चांगलेच ट्रॉल झाले आहेत. शिंदेनी यावेळी MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना लोकसेवा आयोग बोलण्याऐवजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असं म्हंटल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
राष्टवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर हॅन्डल वरून एकनाथ शिंदे यांचा याबाबतचा एक विडिओ शेअर करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले…असा टोला राष्ट्रवादीने लगावला.
यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले…@mieknathshinde pic.twitter.com/Nm0iSWNJyv
— NCP (@NCPspeaks) February 22, 2023
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले होते?
प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः बोललो. विद्यार्थ्यांनी जी भूमिका घेतली आहे तीच भूमिका सरकारची सुद्धा आहे. त्यांच्याशी सरकार सहमत आहे. ही नवी पद्धत 2025 पासून लागू करण्याची मागणी होती, त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिलेलं आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. आम्ही पत्र दिलेलं आहे आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भूमिका त्यासोबत सरकार सहमत आहे आणि तशाच प्रकारची परीक्षा व्हावी. 2025 पासून नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा व्हावी असं शिंदे म्हणाले.