राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणूक लढवणार ; स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर

sharad pawar ncp
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिहार विधानसभा निवडणुक लढवण्याच्या तयारीत असून बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने 40 स्टार प्रचारकांची यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर केली आहे. बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्य स्टार प्रचारक पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणूकीबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक जाहीर करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, के. के. शर्मा, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राजीव झा, नरेंद्र वर्मा, राजेंद्र जैन, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. जे. जोसेमन, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, पुष्पेंद्र मलिक, सीमा मलिक, विरेंद्र सिंग, गोविंदभाई परमार, वेदपाल चौधरी, उमाशंकर यादव, एस. पी. शर्मा, मुरलीमनोहर पांडे, नवलकिशोर साही, राहत काद्री, जितेंद्र पासवान, ललिता सिंग, संजय केशरी, इस्तियाक आलम, अकबर अली, मनोज जैस्वाल, खुशारो आफ्रीदी, ब्रिजबिहारी मिश्रा, शकील अहमद, अझर आलम, इंदू सिंग, चांदबाबू रहेमान, चंद्रेश कुमार, चंद्रशेखर सिंग आदींचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनाही बिहार निवडणूक लढणार अशी घोषणा केली होती. बिहार निवडणुकीसाठी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी सारखे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष देखील निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याने निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये जेडीयू, भाजप विरुद्ध आरजेडी, काँग्रेस असा थेट सामना होणार असून एलजेपी ही स्वतंत्र लढत असल्याने त्याचा परिणाम काही जागांवर होऊ शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’